राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ‘अनंत निर्मल ग्लोबल’च्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ‘अनंत निर्मल ग्लोबल’च्या विद्यार्थ्यांचे यश
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ‘अनंत निर्मल ग्लोबल’च्या विद्यार्थ्यांचे यश

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ‘अनंत निर्मल ग्लोबल’च्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

भोर, ता. २ ः सिद्धिविनायक फायटर्स अकादमी निगडी, पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत राजगड ज्ञानपीठाच्या धांगवडी (ता.भोर) येथील अनंत निर्मल ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व्दितीय क्रमांक मिळवला. याशिवाय एकूण १० सुवर्णपदके, १५ रौप्य आणि १० कांस्य पदके पटकावली. श्रीन्मई सराफ, साई कर्डिले, साई थिटे, विहान सोंडकर, श्रुती खिलारे, समर्थ रांजणे, जान्हवी शिरगावकर, वैष्णवी पांचाळ या विद्यार्थ्यांनी वैयक्तीक प्रकारात सुवर्णपदक मिळविले. तर, श्रवण जगताप, अधिराज जगताप, समीर जाधव, आयुष वीर, संग्राम कांबळे, ओवी भालघरे, ईश्वरी शेटे, आरोही कुडले, दिग्विजय सोनवणे, शरण पॉलिएडाथ, राजवर्धन निगडे, ओवी लाले, मनस्विनी सोनवणे, सत्यजित शेडगे व आसावरी सोनवणे या विद्यार्थ्यांनी रौप्य पदके मिळवली. अनंत निर्मल ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक किरण साळेकर, प्राचार्या सहिबा शेख व राहुल खामकर यांनी मार्गदर्शन केले. राजगड ज्ञानपीठचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव थोपटे, कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे व सचिव स्वरूपा थोपटे यांनी विद्यार्थी व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.