
भोरमध्ये ग्रामपंचायतींसाठी ७४२ उमेदवारांचे अर्ज दाखल
भोर, ता. ३ : भोर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता ७४२ इच्छुक उमेदवारांची अर्ज दाखल केले. यामध्ये १६० सरपंचपदाच्या उमेदवारांचा; तर ५८२ सदस्यपदाच्या उमेदवारांचा समावेश आहे. सरपंचपदाच्या ५४ जागांसाठी १६० उमेदवारांनी; तर सदस्यांच्या ३६४ जागांसाठी ५८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
भोर येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमध्ये निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया झाली. शुक्रवारी शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत सदस्यपदाच्या ३४१ उमेदवारांनी आणि सरपंचपदाच्या ८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सोमवारी (ता. ५) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, बुधवारी (ता. ७) दुपारी तीन
वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. तालुक्यातील कर्नावड व कारी या दोन ग्रामपंचायतींमध्ये ९ सदस्य; तर ५२ ग्रामपंचायती या ७ सदस्यांच्या आहेत.