Tue, Feb 7, 2023

भोर तालुका मतमोजणीच्या होणार
६ फेऱ्या, दुपारी १ वाजेपर्यंत निकाल
भोर तालुका मतमोजणीच्या होणार ६ फेऱ्या, दुपारी १ वाजेपर्यंत निकाल
Published on : 19 December 2022, 1:02 am
भोर, ता. १९ : तालुक्यातील रविवारी (ता. १८) मतदान झालेल्या ३० ग्रामपंचायतींची मतमोजणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मंगळवारी (ता. २०) सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. तर, दुपारी एक वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती येतील, अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
मतमोजणीसाठी १५ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणीच्या ६ फेऱ्या होणार आहेत. एका फेरीनंतर ५ ग्रामपंचायत निकाल हाती येतील. मतमोजणीसाठी १५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना मतमोजणी प्रवेशपत्र देण्यात आले असून त्यांनी मतमोजणी केंद्रात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
मतमोजणी केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.