भोरमध्ये ‘नोटा’ला उमेदवारांपेक्षा जास्त मते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमध्ये ‘नोटा’ला उमेदवारांपेक्षा जास्त मते
भोरमध्ये ‘नोटा’ला उमेदवारांपेक्षा जास्त मते

भोरमध्ये ‘नोटा’ला उमेदवारांपेक्षा जास्त मते

sakal_logo
By

भोर, ता. २१ : भोर तालुक्यातील म्हाकोशी, वागजवाडी आणि सांगवी हि.मा. या ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची चर्चा तालुक्यात सुरु झाली. कारण, म्हाकोशी येथे सदस्यपदाच्या उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला जास्त मते मिळाली, तर वागजवाडी व सांगवी हि.मा. येथे दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीवर विजयी उमेदवार ठरविण्यात आला. याशिवाय वागजवाडीचे सरपंच हे केवळ एका मताने विजयी झाले. म्हाकोशी येथील प्रभाग क्रमांक एकमध्ये सदस्यपदाच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात संगीता सोपान तुपे यांना १२३ मते मिळाली. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र, त्याखालोखाल नोटा क्रमांक १ ला २८ आणि नोटा क्रमांक २ ला १०४ मते पडली. तर, दुसरे उमेदवार रेखा विजय साळेकर यांना ४३ आणि तिसऱ्या उमेदवार कविता राजेंद्र शेडगे यांना ४२ मते मिळाली. त्यामुळे तालुका निर्णय अधिकारी तहसीलदार सचिन पाटील यांनी निवडणूक निरीक्षक राजेंद्र कचरे व राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ४३ मते मिळविणाऱ्या रेखा साळेकर यांना विजयी घोषित केले.
वागजवाडीमध्ये निकीता आवाळे या केवळ एका मताने विजयी झाल्या. येथे प्रभाग क्रमांक २मध्ये संतोष राऊत व अजित राऊत यांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीवर संतोष राऊत विजयी झाले. तर, सांगवी-हि.मा.मध्ये महेंद्र रवळेकर व कौशल बांदल यांना समान मते मिळाली. यामध्ये कौशल हे चिठ्ठीवर विजयी झाले.