शनीघाट सुशोभिकरणाच्या कामाचे भूमीपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शनीघाट सुशोभिकरणाच्या कामाचे भूमीपूजन
शनीघाट सुशोभिकरणाच्या कामाचे भूमीपूजन

शनीघाट सुशोभिकरणाच्या कामाचे भूमीपूजन

sakal_logo
By

भोर, ता. ११ : ‘‘शहरातील राजवाडा चौकाजवळील शनीघाटाचे रुप पालटणार असून निवडणूकीच्या जाहीरनाम्यात केलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.’’ असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
साडेपाच कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्याच्या कामाचे भूमीपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शनिघाटावर झालेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष समीर सागळे, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, कृष्णाजी शिनगारे, काँग्रेसच्या महिलाध्यक्षा गितांजली शेटे, बंडूशेठ गुजराथी, विक्रम चव्हाण, रमेश ओसवाल, ठेकेदार सुभाष दिवाण आदी उपस्थित होते. नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपर्ण योजनेतून दीड कोटी आणि स्वच्छ सर्वेक्षण प्रोत्साहनपर अनुदानातून ३ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी खर्चून शनिघाटाचे मूर्त रुप करण्यात येणार आहे. नीरा नदीवरील तहसील कार्यालयाच्या बाजूला शनीघाटावर दीपमाळ, बुरूज, डेकोरेटीव्ह दगडी बांधकाम असलेली रिटेनिंग वॉल, मिनी थिएटर, ओपन जिम, जॉगींग ट्रॅक, बाग व लहान मुलांची खेळणी आदी कामे केली जाणार आहेत. याशिवाय भिंतीवर ऐतिहासीक शिल्पचित्रे काढण्यात येणार आहेत. हे सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर तेथे बोटींग क्लब, कारंजे व लेझर शो आदी प्रस्तावित कामे करणार असल्याचेही थोपटे यांनी सांगितले.

भोरच्या सौंदर्यात पडणार भर
शहरातील राजवाडा, चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा, वाघजाई मंदीर, भोरेश्वर मंदीर, एसटी स्टँड जवळील सेल्फी पॉईंट, नगरपालिका इमारत, स्वामी समर्थ मंदीर आदी प्रमुख स्थळांबरोबर यापुढे शनीघाटही भोर शहराच्या निसर्गसौंदर्यात भर टाकणारा ठरणार आहे. सायंकाळी नागरिकांना फिरण्यासाठी आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांना हक्काचे ठिकाण मिळणार असल्यामुळे स्थानिकांना व्यवसायाच्या संधी मिळणार असल्याचे संग्राम थोपटे यांनी सांगितले.

भोर : शनिघाटाच्या सुशोभिकरणाच्या भूमीपूजनप्रसंगी आमदार संग्रम थोपटे व इतर.