
भोर येथील विज्ञान प्रदर्शनात १३९ प्रकल्प
भोर, ता. १३ : येथील तालुका विज्ञान प्रदर्शनात लहान गटात न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज संगमनेर मधील श्रेया गायकवाड हिच्या ''घराची सुरक्षीतता'' या प्रकल्पास, तर मोठ्या गटात संत लिंगनाथस्वामी विद्यालय भोंगवलीच्या वैष्णव शेडगे याच्या ''गणपती विसर्जन'' या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला आहे.
येथील गर्ल्स हायस्कूल व ज्यू कॉलेजमध्ये झालेल्या दोन दिवसांच्या विज्ञान प्रदर्शनात १३९ प्रकल्प मांडले होते. नगराध्यक्षा निर्मला आवारे यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. तर गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
यावेळी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रमेश बुदगुडे, सचिव सुनील गायकवाड, तालुका विज्ञान समितीचे अध्यक्ष रावसाहेब चौधरी, रोबोकॉब कॉम्प्युटर्सचे संचालक प्रा. विजय जाधव, गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उषा कदम, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब ताडे व वृषाली पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर वंदना कुंभार यांनी आभार मानले.
विज्ञान प्रदर्शनातील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे-
छोटा गट- प्रथम- श्रेया गायकवाड (घराची सुरक्षीतता, न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर), व्दितीय-अनुष्का मरगजे (नदी स्वच्छता प्रकल्प, गर्ल्स हायस्कूल भोर), तृतीय-अथर्व पवार (इलेक्ट्रीक स्क्रू, पसुरे माध्यमिक विद्यालय).
मोठा गट-प्रथम- वैष्णव शेडगे (गणपती विसर्जन, संत लिंगनाथस्वामी विद्यालय भोंगवली), व्दितीय- अथर्व नेवसे (नेशन विदाऊट अॅक्सीडंट, शिवाजी विद्यालय नसरापूर), तृतीय- विकास वर्मा (इकोफ्रेंडली धान्यरक्षक गोळी, महात्मा जोतीबा फुले प्रशाला शिंदेवाडी).
निबंध स्पर्धा-
छोटा गट- प्रिती तुपे (प्रथम), समिक्षा चव्हाण (व्दितीय), वैष्णवी कंक (तृतीय). मोठा गट- स्वराली पाटील (प्रथम), वैष्णवी दुधाणे (व्दितीय), जाई खोपडे (तृतीय).
वकृत्व स्पर्धा- छोटा गट- प्रवीण ढवळे (प्रथम, आपटी माध्यमिक विद्यालय),
पार्थ जाधव (व्दितीय, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल), राधिका गोखले (क्रांतीवीरा वासुदेव फडके विद्यालय रायरी). मोठा गट -प्राजक्ता अहिरराव (प्रथम, गर्ल्स हायस्कूल भोर), सिद्धी भरगुडे (द्वितीय, पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे), संस्कृती शेटे (तृतीय, न्यू इंग्लिश स्कूल उत्रौली).
प्राथमिक शिक्षक गट- प्रथम- सागर खैरमोडे (गणितीय शैक्षणीक पध्दत, प्रा. शाळा नसरापूर), व्दितीय- परशुराम लडकत (तंत्रज्ञानाव्दारे निर्मित शैक्षणीक साधणे, प्रा. शाळा साळुंगण).
माध्यमिक शिक्षक गट- प्रथम-ए, एस बाबर (गणितीय पेटी, शिवाजी विद्यालय भोर), एस. एम. भरते (शैक्षणीक वर्ग, दिनकरराव धाडवे विद्यालय सारोळे).
प्रयोगशाळा परिचर गट- प्रथम- केशव पवळे (प्रायोगिक साधने, राजा रघुनाथराव विद्यालय), व्दितीय- मारुती चिकणे (आधुनिक वीजनिर्मिती. पसुरे माध्यमिक विद्यालय).
प्रश्नमंजूषा- गर्ल्स हायस्कूल (प्रथम), छत्रपती शिवाजी विद्यालय भोर (व्दितीय), सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय खानापूर(तृतीय).