
भोर उपजिल्हा रुग्णालयाची वीज तोडण्याबाबत नोटीस
भोर, ता. २५ : भोर येथील राज्य सरकारच्या उपजिल्हा रुग्णालयाची वीजजोड तीन वर्षांचे ९ लाख ६३ हजार ६६० रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे तोडण्यात येणार आहे. याबाबतची नोटीस ‘महावितरण’कडून रुग्णालयास देण्यात आले आहे.
बुधवारी (ता. ३५) दुपारी चार वाजता रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. अशा आशयाची नोटीस महावितरणने वैद्यकीय अधीक्षकांना दिलेली होती. मात्र, रुग्णालयास शासकीय निधी मिळाला नसल्यामुळे वीज बिल भरण्यात आली नाही. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी महावितरणच्या वरिष्ठ कार्याची संपर्क साधला. पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये वीज बिल भरण्याचे लेखी पत्र रुग्णालयाकडून महावितरणला देण्यात आले. त्यामुळे बुधवारी वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली.
दरम्यान, भोरच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात दिल्या जाणाऱ्या भोरच्या उपजिल्हा रुग्णालयास निधी उपलब्ध करीत नसल्यामुळे तालुक्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.