भोर व वेल्हे तालुक्यातील 
विद्यार्थी परिक्षेसाठी सज्ज

भोर व वेल्हे तालुक्यातील विद्यार्थी परिक्षेसाठी सज्ज

भोर, ता. २० : भोर व वेल्हे तालुक्यातून मंगळवारी (ता. २१) पासून सुरु होणाऱ्या उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या परीक्षेला २ हजार ५४० विद्यार्थी बसले आहेत. अशी माहिती भोरच्या परीक्षक तथा गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, सहाय्यक परीक्षक शंकर दलवाई व रमेश शेटे यांनी दिली.
भोर शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयात बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी कष्टडीची सुरक्षीत व्यवस्था केली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी भोर व वेल्हे तालुक्यात प्रत्येकी दोन परीक्षा केंद्रे आहेत. भोर शहरातील अनंतराव थोपटे महाविद्यालय, नसरापूर (ता. भोर) येथील शिवाजी विद्यालय आणि वेल्हे तालुक्यातील आंबवणे येथील सरस्वती विद्यामंदीर व विंझर येथील न्यू इंग्लिश स्कूल विंझर या चार केंद्रांवर परीक्षा होणार आहे. अनंतराव थोपटे महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सर्वाधिक १ हजार ५८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिवाजी विद्यालयात ४०७, सरस्वती विद्यामंदिरात २२७ आणि न्यू इंग्लिश स्कूल विंझर येथे ३१९ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेसाठी १०१ वर्गखोल्यांची व्यवस्था केली आहे. दरम्यान सोमवारी (ता. २०) परीक्षक अश्विनी सोनवणे यांनी सर्व परीक्षाकेंद्र संचालक आणि प्रश्नपत्रिका पोहोच करण्यासाठी आणि पेपर एकत्र करण्यासाठी असलेले रनर यांची संयुक्त बैठक घेतली. बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठीच्या सूचना गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com