भोर तालुक्यामधील नागरिक उन्हाच्या चटक्यामुळे हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर तालुक्यामधील नागरिक उन्हाच्या चटक्यामुळे हैराण
भोर तालुक्यामधील नागरिक उन्हाच्या चटक्यामुळे हैराण

भोर तालुक्यामधील नागरिक उन्हाच्या चटक्यामुळे हैराण

sakal_logo
By

भोर, ता. २५ : रात्रीची बोचरी थंडी... पहाटेचा सुसाट वारा... अन्‌ दुपारी उन्हाचा चटका यामुळे भोर तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिक व महिला उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करू लागले आहे. महाविद्यालयीन तरुणी, मुली व महिला या स्कार्फ बांधून तर तरुण आणि पुरुष मंडळी डोक्यावर टोपी घालून फिरताना दिसत आहेत.

तालुक्यात दुपारचे तापमान ४० अंशापर्यंत जात आहे तर रात्रीचे १० ते १५ अंशापर्यंत खाली येत आहे. ऋतू बदलाच्या या वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य काहीसे धोक्यात आले आहे. भोरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पांडुरंग दोडके यांनी सांगितले की, वातावरणाच्या या बदलामुळे दमा असलेल्या व्यक्तींना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. उन्हापासून बचाव करण्याच्या उपाययोजना कराव्यात. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेस बसलेल्या आणि पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी याबाबत अधिक काळजी घ्यावी.
01359