जिजाऊंचा धाडसीपणा महिलांनी आत्मसात करावा

जिजाऊंचा धाडसीपणा महिलांनी आत्मसात करावा

भोर, ता. २६ : ''''राजमाता जिजाऊंचा धाडसीपणा महिलांनी आत्मसात करावा. असे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तरुणांच्या कृतीतून उतरू लागतील,'''' असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

भोर येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिवजयंतीनिमित्त येथील सोनाली गार्डनच्या सभागृहात रविवारी (ता.२६) आयोजित केलेल्या विचारांच्या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तीगीतांसह विविध प्रकारचे कार्यगौरव पुरस्कार आणि छत्रपती शिवरायांच्या वंशजांचाही सन्मान करण्यात आला.

पुण्यातील बा. रा. घोलप महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्र विभागाच्या प्रमुख डॉ. चंद्रकला हासे यांना राष्ट्रमाता जिजाऊ कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरदार बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज दिलीप देशपांडे व सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज रणधीर जेधे यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती झालेल्या डॉ. मेघना भोसले आणि भोरचे पहिले दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांचे चिरंजीव कश्यप साळुंके यांचाही गौरव करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विचारा महोत्सवात मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, प्राचार्य डॉ. शिवाजीराव ढगे, नीलेश घोडेस्वार, डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. प्रदीप पाटील, भुजंगराव दाभाडे, पंढरीनाथ भिलारे, अविनाश मोरे, शत्रुघ्न तायडे, योगेश सरोदे व प्रफुल्ल बनसोडे आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.

प्रा. रवींद्र भालेराव यांनी प्रास्ताविक केले. सुजाता भालेराव यांनी सूत्रसंचालन तर दीपक रणभिसे यांनी आभार मानले.

जिजाऊंसारख्या मातृत्वास जात व धर्म नसतो त्यांचे विचार हे कायमस्वरूपी सूर्यप्रकाशासारखे राहतात. समाजात विचार मांडणारे लोक भरपूर आहेत परंतु शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
- डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

01364

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com