पारंपरिक वेशभूषेने वेधले लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारंपरिक वेशभूषेने वेधले लक्ष
पारंपरिक वेशभूषेने वेधले लक्ष

पारंपरिक वेशभूषेने वेधले लक्ष

sakal_logo
By

भोर, ता. २७ : येथील विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त शहरातून मराठी पुस्तकांची आणि ग्रंथांची दिंडी काढली. याशिवाय विद्यार्थ्यांनी मराठी पारंपरिक वेशभूषा करून भारूड, अभंग, पोवाडे आणि भजने गाऊन मराठी दिनाचा आनंद साजरा केला. भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी या उपक्रम केला. यामध्ये विद्यालयातील तीनशे विद्यार्थी सहभागी झाले. येथील राजवाडा चौकात भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडी व पुस्तकदिंडीचे पूजन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक यशवंत डाळ, प्रा. विजय जाधव, सारंग शेटे, विलास मादगुडे, पल्लवी फडणीस उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजता राजवाडा चौकात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी मराठी गीतांवर नृत्य सादर करून मराठी परंपरेची जाणीव उपस्थितांना करून दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भारुड, शिवरायांचे पोवाडे आणि गोंधळगीतांवरील नृत्यास सर्वाधिक पसंती मिळाली. विद्यार्थ्यांच्या कला पाहण्यासाठी भोरवासीयांनी गर्दी केली.