भोर, वेल्हे तालुक्यात तीन हजार विद्यार्थी

भोर, वेल्हे तालुक्यात तीन हजार विद्यार्थी

भोर, ता. १: माध्यमिक परीक्षा मंडळाच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, भोर व वेल्हे तालुक्यातून ३ हजार २०६ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. भोर व वेल्हे तालुक्यातील आणि खेड-शिवापूरमधील १० परीक्षाकेंद्रांवरील १२८ वर्गखोल्यांची स्वच्छता केली आहे, अशी माहिती भोरच्या परिरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, सहायक परीक्षक शंकर दलवाई व रमेश शेटे यांनी दिली.
दहावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठीच्या सूचना गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी संबंधित परीक्षाकेंद्रांच्या प्रमुखांना दिल्या आहेत.
दरम्यान, भोर शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयात दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी कष्टडीची सुरक्षीत व्यवस्था करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी भोर तालुक्यात ६ वेल्हे तालुक्यातील ३ आणि हवेली तालुक्यातील एक अशा एकून १० परीक्षाकेंद्राचे कामकाजाचे नियंत्रण भोरच्या परीरक्षक केंद्रातून केले जाणार आहे. भोरमधील परीक्षाकेंद्रे पुढीलप्रमाणे कंसात परीक्षेस बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या - राजा रघुनाथराव विद्यालय (३७१), छत्रपती शिवाजी विद्यालय (३१०), जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल (३७७), शिवाजी विद्यालय नसरापूर (३८२), नागेश्वर विद्यालय आंबवडे (२९१), छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी (२३६). वेल्हे तालुका - न्यू इंग्लिश स्कूल विंझर ( १८२), तोरणा विद्यालय वेल्हे (१८२), सरस्वती विद्यालय आंबवणे (३४६). हवेली तालुका - शिवभूमी विद्यालय खेड-शिवापूर (५५०).

01390

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com