भोरमधील आरोग्य समस्यांची विधानसभा अधिवेशनात चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमधील आरोग्य समस्यांची
विधानसभा अधिवेशनात चर्चा
भोरमधील आरोग्य समस्यांची विधानसभा अधिवेशनात चर्चा

भोरमधील आरोग्य समस्यांची विधानसभा अधिवेशनात चर्चा

sakal_logo
By

भोर, ता. ४ : आमदार संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य विभागातील समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशात शुक्रवारी (ता. ३) प्रश्न उपस्थित केला.
भोर मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भराव्यात, भोरमधील रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयाचे विजेचे बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि वेल्हे तालुक्यातील करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचारादरम्यान मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करावी, या मागण्या अधिवेशनात आमदार थोपटे यांनी मांडल्या. यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहात सकारात्मक उत्तर देत लवकरच याबाबत बैठक लावून सर्व समस्या त्वरित सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी (ता. ३) ‘महवितरण’ने भोरच्या उपजिल्हा रुग्णालयाचा खंडीत केलेला वीजपुरठा सुरळीत करण्यासाठी आमदार थोपटे यांनी मध्यस्थी केल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके यांनी सांगितले.