भोरमध्ये टिकाऊ वस्तूंच्या कलाकृतीचे प्रदर्शन

भोरमध्ये टिकाऊ वस्तूंच्या कलाकृतीचे प्रदर्शन

भोर, ता. ९ : जागतिक महिला दिनानिमित्त नगरपालिकेमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंच्या कलाकृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले. ''ग्रीनी द ग्रेट'' संस्थेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या प्रदर्शनात शहरातील गर्ल्स हायस्कूल आणि गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ३० उपक्रम सादर केले.
नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत बुधवारी (ता.८) हा उपक्रम राबविण्यात आला. प्रदर्शनात सुमारे ४०० महिलांनी या उपक्रमाची माहिती घेतली.

वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गर्ल्स हायस्कूलमधील २० विद्यार्थिनींनी आणि गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमधील २१ विद्यार्थ्यांनी उपक्रमांबाबत माहिती दिली. बायोगॅस, सोलार एनर्जी, शोभेच्या वस्तू, कागदापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक वस्तू, सोलारवरील विजेच्या उपकरणांची घेण्याची काळजी यासंदर्भात विद्यार्थ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष निर्मला आवारे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष समीर सागळे, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, अमित सागळे, किशोरी फणसेकर, स्मिता जाधव, अभिजित सोनवले आणि आरोग्य विभागासाठी काम करणा-या ''ग्रीनी द ग्रेट'' या संस्थेचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. नगरपालिकेच्या वतीने परीक्षण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. गर्ल्स हायस्कूलमधील वेदिका खाटपे, संस्कृती वेणुपुरे, माहीम शेख, यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय, तृतीय व क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. तर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मधील पार्थ कोठावळे, शुभम बांदल व प्रणव खोपडे यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले.

01431

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com