चौपाटी - महाड नाका मार्ग धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौपाटी - महाड नाका मार्ग धोकादायक
चौपाटी - महाड नाका मार्ग धोकादायक

चौपाटी - महाड नाका मार्ग धोकादायक

sakal_logo
By

भोर, ता. १७ : शहरातील चौपाटी ते महाड नाका या दरम्यानच्या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे, परंतु ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात एखादा अनर्थ घडण्याअगोदर योग्य त्या उपायांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे.


गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र कोठेही सूचनाफलक, दिशादर्शक फलक, काम सुरू व अपघाताचा धोका असलेले फलक आणि पर्यायी रस्ता वापरण्याबाबतचे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे शंभर मीटर अंतरावर जाण्यासाठी मोठ्या गाड्या किंवा मोटारीच नव्हे तर दुचाकीस्वारांनाही दोन किलोमीटरचे अंतर पुढे जावे लागत आहे. नगरपालिकेकडून या रस्त्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलेला आहे. या मार्गावर पोलिस ठाणे, शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये आणि प्राथमिक शाळा आहेत. याशिवाय मांढरदेवी, वरंधा घाट, नीरा देवघर धरण, अंबवडे रायरेश्वर आणि महाडला जाणाऱ्या वाहनांची गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर नेहमी वाहतुकीची कोंडी होत आहे. या मार्गावर वाहनचालकांना नेहमी जीव मोठी धरून वाहन चालवावे लागत आहे. दुचाकीस्वारांना तर कसरतच करावी लागत आहे, परंतु नगरपालिका प्रशासनाने आणि ठेकेदाराने वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावर आवश्यक तेथे दिशादर्शक व सूचनाफलक लावावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
------------------------