वरंधा घाटात अनोळखी तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला

वरंधा घाटात अनोळखी तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला

वरंधा घाटात आढळला
अनोळखी तरुणाचा मृतदेह
भोर, ता. १७ : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात वारवंड गावच्या हद्दीत अनोळखी तरुणाचा कुजलेला मृतदेह गुरुवारी (ता. १६) रात्री आढळून आला. पोलिस पाटील सुधीर दिघे यांनी याबाबत पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलिस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या तरुणाचा आहे. मृतदेहाच्या अंगावर कपडे आणि कोणतीही वस्तू नसल्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही. मृतदेह चार-पाच दिवसांपूर्वीचा असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तरुणाचा खून करून मृतदेह वरंधा घाटात आणून टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत कोणास माहिती असल्यास भोर पोलिस ठाण्याशी (दूरध्वनी क्रमांक ०२११३-२२२५३३) संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com