विविध उपक्रमातून चिमणी दिन साजरा

विविध उपक्रमातून चिमणी दिन साजरा

भोर, ता. २० : जागतिक चिमणी दिनानिमित्त सोमवारी (ता. २०) भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पर्यावरण साखळीतील चिमण्यांचे महत्त्व, चित्रकला स्पर्धा, चिमण्यांसाठी घरटी बनविण्याची स्पर्धा आणि वत्कृत्व स्पर्धेचा समावेश आहे. मुख्याध्यापक सुभाष जाधव आणि शिक्षक संतोष दळवी व धनंजय कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात आले.
गेल्या १० वर्षांपासून पिसावरेच्या विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा केला जात आहे.
चिमण्यांबाबत माहिती देताना संतोष दळवी म्हणाले, ‘‘जगात २६ प्रकारच्या चिमण्या असून भारतात ५ प्रकारच्या चिमण्या आढळतात. चीनमध्ये १९५८ पासून चिमण्या मारायला परवानगी दिल्यामुळे चीनला दुष्काळाचा सामना करावा लागला. हा चिमणी संपवल्याचा परिणाम असल्याचे शास्रज्ञांच्या लक्षात आल्यामुळे रशियामधून चीनमध्ये चिमण्या आणण्यात आल्या. भारतामध्येही अशी परिस्थिती होऊ नये. यासाठी विद्यालयातील विद्यार्थी चिमण्यांसाठी कृत्रीम घरटी आणि पाणवठे तयार करून गावातील घरांमध्ये मोफत देत आहेत.’’ यावर्षीदेखील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या घरट्यांचे ग्रामस्थांना वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बार्न आउट बर्डींग ग्रुप, पिसावरे व फ्रेन्ड्स सोशल फाउंडेशन यांनी सहकार्य केले. चिमण्यांसाठी घरटी तयार करण्याच्या स्पर्धेत तृप्ती चौधरी, श्रुतिका धुमाळ, आयुष बरदराडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. तर वत्कृत्व स्पर्धेत रिद्धी प्रधान आणि चित्रकला स्पर्धेत प्रगती बांदल यांनी अव्वल स्थान पटकविले. मुख्याध्यापक सुभाष जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी उज्वला ढोणे, ज्योती साळेकर, स्वाती बांदल, प्रीतम अडसूळ, रविशा बरदाडे, विद्या बरदाडे, ऋतुजा बरदाडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com