Mon, May 29, 2023

चिमुकल्यांनी घेतला पारंपरिक वेशभूषेचा आनंद
चिमुकल्यांनी घेतला पारंपरिक वेशभूषेचा आनंद
Published on : 22 March 2023, 4:09 am
भोर, ता. २२ : गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी महिलांसोबत चिमुकली मुले व मुलीही पारंपरिक वेशभूषेचा आनंद घेवू लागले आहेत. परंपरेप्रमाणे नऊवारी साडी व चोळी, धोतर-कुर्ता, पायजमा-शर्ट या प्रकारचे कपडे परिधान करून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्ष दिनात सहभागी झाले. काही चिमुकल्यांनी गुढी उभारतेवेळी खांद्यावर उपरणे, धोतर अशी वेशभूषा केली होती. आजी-आजोबांच्या सहवासामुळे मुला-मुलींमध्ये पारंपरिक कपडे परिधान करण्याची सवय लागल्याचे पालक सांगतात. अनेक चिमुकल्यांनी आपल्या आजी-आजोबांसोबत देवाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्येही हजेरी लावली.