उत्रोलीतील चौघांना मारहाणप्रकरणी अटक

उत्रोलीतील चौघांना मारहाणप्रकरणी अटक

भोर, ता. १६ ः यात्रेत नाचण्याच्या कारणावरून वाद घालून मारामारी केल्याप्रकरणी उत्रोलीतील (ता. भोर) चार जणांना भोर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भोर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत. दानेश शेख (वय २१), सचिन वीर (वय ३३), संतोष वीर आणि नवनाथ वीर अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता.१३) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

पहिली फिर्याद सचिन वीर याने दाखल केली आहे. त्यामध्ये आरोपी दानेश शेख याने सचिनच्या घरासमोर येऊन त्यास मारहाण केली आणि घरात घुसून सचिनची पत्नी व वहिनीस कोयत्याचा धाक दाखवून धक्काबुक्की केली, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर दुसरी फिर्याद दानेश शेख याने केली असून संतोष वीर याने यात्रेच्या पालखीच्या वेळी ‘नीट नाच’ असे म्हणून मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. पोलिस हवालदार वर्षा भोसले व यशवंत शिंदे यांनी चौघांवर गुन्हा दाखल करून तपास केला. दरम्यान, सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता सचिन वीर, संतोष वीर आणि नवनाथ वीर यांना जामीन मंजूर करण्यात आला. तर दानेश शेख याची कारागृहात रवानगी करण्यात आली. दानेश शेख याच्याविरोधात यापूर्वीही मारामारीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com