वरंधा घाटात मोटार घसरली

वरंधा घाटात मोटार घसरली

भोर, ता. ३ : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात वारवंड आणि शिरगाव या गावांच्या दरम्यान मंगळवारी (ता. २) पहाटे स्कॉर्पिओ मोटार नीरा-देवघर धरणाच्या बाजूला दरीत घसरल्याची घटना ताजी असताना आणखी एक मोटार गटारात घसरली. वरंधा घाटातील वाघजाई मंदिराच्या जवळ भोरच्या बाजूला मोटार गटारात गेली. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला. संबंधित मोटार ही महाडच्या बाजूकडून भोर बाजूकडे येत होती. घाटातील वाघजाई मंदिर सोडल्यानंतर सुमारे ५०० मीटर अंतरावर मोटार उजव्या बाजूच्या गटारात घसरली. मोटारीत पाच जण प्रवासी होते. ते सर्व सुखरूप असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी एसटी दरीत कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची आठवण झाली. मंगळवारी एकाच दिवसात दोन अपघात झाल्यामुळे प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी घाटातील रस्त्यावरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com