भोरमध्ये ९ लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

भोरमध्ये ९ लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

भोर, ता. १५ः शासनाच्या कृषी विभागाच्या महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत तालुक्यातील ९ लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. येथील पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या भोर व वेल्हे तालुकाच्या खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर हस्तांतरित करण्यात आले.

आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.१५) सकाळी झालेल्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीस वेल्ह्याचे तहसीलदार दिनेश पारगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल नलावडे, भोर पंचायत समितीचे माजी सभापती लहू शेलार, माजी उपसभापती रोहन बाठे, सतीश चव्हाण, वेल्हा तालुका वेल्हा तालुक्यातील शेतकरी बांधव व कृषी विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी गतवर्षीच्या खरीप हंगामातील भातपीक स्पर्धा आणि रब्बी हंगामातील ज्वारी पीक स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराचे वाटप करण्यात आले आणि कृषी विभागाच्या घडीपत्रीकेचे प्रकाशन करण्यात आले. भोर व वेल्ह्याच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहवाल वाचन करून अगामी खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मस्य व्यवसायाच्या समितीवर आमदार संग्राम थोपटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल भोर व वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांचा आमदार संग्राम थोपटे यांचा सत्कार केला.

योजनेच्या फेरतपासणीची मागणी
कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरून लाभार्थ्याने ट्रॅक्टर खरेदी योजनेचे ऑनलाइन अर्ज भरले. कृषी विभागाकडून त्यास मान्यता दिल्यानंतर संबंधित लाभार्थ्याने ट्रॅक्टर खरेदी केला. परंतु काही महिन्यांनी अनुदान वाटपाच्या वेळी कृषी विभागामार्फत त्याची मोका तपासणी केल्यानंतर संबंधीत लाभार्थ्याला अपात्र ठरविण्यात आले. कोणत्या निकषांमुळे लाभार्थ्याला अपात्र ठरविण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांनी बैठकीत तक्रारी केल्या. त्यानंतर आमदार संग्राम थोपटे यांनी ट्रॅक्टरची फेरतपासणी करण्याची सूचना कृषी विभागाला दिली.


01699

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com