
भोर येथील आरोग्य शिबिरात २,५०० जणांची तपासणी
भोर, ता. १८ : येथील ''निस्वार्थ सेवा युथ महाराष्ट्र राज्य''तर्फे आयोजित आरोग्य शिबिरात २ हजार ५०० जणांची तपासणी करण्यात आली. येथील राजा रघुनाथराव विद्यालयात दोन दिवसांच्या कालावधीत झालेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद गुजर यांच्या हस्ते झाले.
शिबिरात नेत्र तपासणी, डोळ्यांचे ड्रॉप वाटप, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, डोकेदुखी, ताप, सर्दी, अंगदुखी, पोटाचे विकार व मणक्याच्या आजारांवर तपासणी व उपचार करण्यात आले. भोलावडे, किवत, पळसोशी, म्हसर, शिंद, बारे, पसुरे, आपटी, निगुडघर, उत्रौली व वडगाव या गावातील नागरिकांना लाभ मिळाला. यामध्ये १ हजार ७०० ज्येष्ठ नागरिक व महिला, ६०० तरुण-तरुणी आणि २०० लहान मुलांचा समावेश आहे.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, निःस्वार्थ सेवा युथचे अध्यक्ष रोहन भोसले, सुरेश शहा, अनिल सावले, अंकुश भोसले, उषा कुलकर्णी, सोमनाथ कुंभार, विजयकुमार देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. नगर येथील डॉ. ऋषिकेश कवाडे, डॉ. मयूर रासकर, डॉ. किशोर कवाडे, डॉ. शबीक शेख यांनी सहाकाऱ्यांसमवेत तपासणी व उपचार केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ओंकार दानवले, ओंकार सापे, आकाश दनावले, अमर भोसले, जीवन भोसले, विकास दानवले, यश भोसले यांनी विशेष प्रयत्न केले.