डॉल्बी-डीजेच्या जमान्यात वाजंत्र्यांची चलती

डॉल्बी-डीजेच्या जमान्यात वाजंत्र्यांची चलती

भोर, ता. २३ः जुन्या काळातील लग्न समारंभामध्ये वाजणारी वाजंत्र्यांची परंपरा आजही भोर तालुक्यात जपली जात आहे. सद्यःस्थितीत सर्वच लग्नसमारंभात डॉल्बी-डीजेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु भोर तालुक्यात लग्नसमारंभात डीजे सोबत वाजंत्रीही बोलावले जाते. यामुळे वाजंत्र्याची चलती आहे.
सध्या वाद्य वाजविणारे वाजंत्री नव्याने तयार होत नाहीत. याशिवाय वाजंत्री पथकातील वाद्येही नव्याने निर्माण केली जात नाहीत. भोरच्या ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या मुला-मुलींच्या लग्नात अजूनही वाजंत्री असण्याचा हट्ट धरत आहेत. एका वाजंत्री पथकात ताशावाला, ढफवाला, ठोलकीवाला, दोन सनईवाले, भोंग्यावाला आणि तुतारीवाला (शिंगवाला) अशी माणसे असतात. पूर्वी वाजंत्र्यांना गणवेशाबरोबर फेटे असायचे परंतु आता गांधी टोप्या वापरल्या जात आहेत. मात्र वाजंत्र्यांकडून जुनीच गाणी वाजवली जात आहेत. आणि जुनी गाणीच सर्वांना आवडतात, त्याच गाण्यांना त्यांना जास्त लाईकस् मिळतात.
नवरा-नवरीचे धार्मिक विधी करण्यासाठी, नवरदेव श्रीवंदनाला जाताना, नवरा-नवरी लग्नमंडपात जाताना आणि लग्नात मंगलाष्टका झाल्यानंतर वाजंत्र्यांचा मान आजही राखला जात आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजात वाजंत्रीमधील वाद्यांचे सुमधूर आणि मंजूळ सूर मनाला तजेला देतात.जुनी माणसे अजूनही लग्नसमारंभातील वाजंत्र्यांना भेट म्हणून पैसे देत आहेत. लग्न झाल्यानंतर मुलगी जाताना सनईच्या सूरातच तीला निरोप दिला जातो. आजही सनईचे सूर कानावर पडले तरच लग्न झाले असे वाटते, त्यामुळे वाजंत्र्यांची ही परंपरा टिकून आहे. यामुळे सध्या लग्नसराईत वाजंत्र्यांची चलती आहे.


01729

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com