भोरला एसटी स्टँडवर वारकऱ्यांचे भजन आंदोलन

भोरला एसटी स्टँडवर वारकऱ्यांचे भजन आंदोलन

भोर, ता. २४ ः राज्य परिवहन महामंडळाच्या भोर आगाराच्या विरोधात वारकऱ्यांनी एसटी स्टँडवर भजन करत आंदोलन केले. वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्या-येण्यासाठी एसटी बस उपलब्ध केली जात नाही. पंढरपूरसाठी एसटी सोडल्यानंतर वारकऱ्यांना न घेताच एसटी लगेचच परत माघारी येते. या कारणासाठी मंगळवारी (ता. २३) सकाळी एसटी स्टँडवर वारकऱ्यांनी भजन आंदोलन केले. यामध्ये महिला वाकरऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. भोर आगारकडून वारकऱ्यांसाठी भोर ते पंढरपूर एसटी सकाळी सात वाजता भोरमधून निघते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा परत येते. यासाठीचे नियमित प्रवासभाडे घेतले जाते. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वी एसटी वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरला गेली आणि प्रवाशांना तेथे सोडून एसटी लगेचच परत आली. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरवरून भोरला येण्यासाठी त्रास सहन करावा लागला. यासाठी हे भजन आंदोलन करण्यात आले. याबाबत भोरचे आगार व्यवस्थापक प्रवीण बांद्रे यांनी सांगितले की, सध्याच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीच्या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. पंढरपूरला एसटी गेल्यानंतर तेथे कित्येक तास वेटिंग करावे लागते. त्यामुळे संबंधित एसटीच्या प्रवासाचे अंतर सुमारे तीनशे किलोमीटरने कमी होते, परिणामी एसटीला तोटा सहन करावा लागतो. परंतु, वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूरवरून भोरला येण्यासाठी नीरा ते भोरपर्यंत एसटीची सोय करण्यात येणार असल्याचे बांद्रे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com