सासरच्या जाचाला कंटाळून भोरला विवाहितेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासरच्या जाचाला कंटाळून भोरला विवाहितेची आत्महत्या
सासरच्या जाचाला कंटाळून भोरला विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून भोरला विवाहितेची आत्महत्या

sakal_logo
By

भोर, ता. २८ : शहरातील न्हावीआळीतील श्रीपाद सोसायटीमध्ये शुक्रवारी (ता. २७) रात्री विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. पद्मजा चंद्रकांत घोरपडे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने श्रीपाद सोसायटीमधील राहत्या घरातील पंख्याला गळफास घेतला. तिचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणारे पती चंद्रकांत मधुकर घोरपडे (वय ४२), सासू कलावती मधुकर घोरपडे, दीर संदीप मधुकर घोरपडे (वय ४०) व जाऊ रेश्मा संदीप घोरपडे यांना पोलिसांनी अटक केली. याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती, पद्मजा हिला २०१४ मध्ये लग्नाच्या दोन महिन्यांनंतर पती, सासू, दीर व जाऊ हे मानसिक व शारीरिक छळ करीत होते. हे सर्वजण मयत पद्मजा हिला घालून पाडून बोलून घरातील कामे नीट येत नाही, असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. याला कंटाळून पद्मजाने आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना लक्षात आली. मयत पद्मजाचे वडील प्रभाकर दिनकर खोपडे यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील चार आरोपींना रविवारी (ता.२८) अटक केली. दरम्यान, चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक बळिराम सांगळे पुढील तपास करीत आहेत.