भोर-वेल्ह्यातील ३७ हजार नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर-वेल्ह्यातील ३७ हजार नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ
भोर-वेल्ह्यातील ३७ हजार नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

भोर-वेल्ह्यातील ३७ हजार नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

sakal_logo
By

भोर, ता. १ ः महसूल विभागाच्या वतीने भोर उपविभागातील भोर आणि वेल्हे तालुक्यात घेतलेल्या ‘शासन आपल्या दारी’ शिबीराचा ३७ हजार १७ नागरिकांना लाभ झाला. यामध्ये भोर तालुक्यातील २८ हजार ४४२ आणि वेल्हे तालुक्यातील ८ हजार ५७५ नागरिकांचा समावेश आहे. अशी माहिती भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
भोर तालुक्यातील शिबिर हे गंगोत्री हॉल, भोर आणि नसरापूर येथील कुंभारकर लॉन्स येथे झाले, तर वेल्हे तालुक्यात शिबीर हे दोन टप्यात घेण्यात आले. यात शासनाच्या सर्व विभागांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना विविध सेवांचा लाभ दिला. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे दाखले, सातबारा फेरफार, नवीन व दुबार रेशन कार्ड, आधार लिंकचे काम, संजय गांधी योजनेचे आणि पीएस किसान योजनेची कामे पूर्ण केली. याशिवाय शासनाच्या पंचायत समिती, कृषी विभाग, वीज वितरण, वन विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, सामाजिक वनिकरण, महिला व बालविकास विभाग, एसटी महामंडळ, बॅंकांच्या संबंधीत सेवाही दिल्या.
दरम्यान शिबीराच्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे (सारथी) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या चार हजार ७०० साहित्यांच्या पुस्तकांची विक्री झाली.
यावेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, सारथीचे उपजिल्हाधिकारी अनिल पवार, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे, तालुका कृषी अधिकारी ढगे, एचडीएफसी बॅंकेचे विक्रांत नगरे, योगेश लुंकड, तुषार टेमगिरे, सहाय्यक निबंधक (सहकार) बाळासाहेब तावरे, नायब तहसीलदार (महसूल) अजिनाथ गाजरे, नायब तहसीलदार हरिदास चाटे, आदी उपस्थित होते.