भोरमधील २१ विद्यालयांचा निकाल १०० टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमधील २१ विद्यालयांचा निकाल १०० टक्के
भोरमधील २१ विद्यालयांचा निकाल १०० टक्के

भोरमधील २१ विद्यालयांचा निकाल १०० टक्के

sakal_logo
By

भोर, ता. ३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत भोर तालुक्याचा निकाल ९७.३१ टक्के लागला. तालुक्यातील ५० विद्यालयांपैकी २१ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात २.१३ टक्यांनी घट झाली. गतवर्षी ९९.४० टक्के निकाल लागला होता.

तालुक्यातील ५० विद्यालयांमधून परीक्षा दिलेल्या २ हजार १५८ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७८० विद्यार्थी हे अतिप्रगत (डिस्टींक्शन) श्रेणीमध्ये पास झाले आहेत. ८४५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३९८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत; तर ७७ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यात केवळ ५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. सारोळे माध्यमिक विद्यालयाचा निकाल सर्वात कमी ८६.३६ टक्के लागला आहे. शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात सर्वाधिक २३७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते तर बसरापूर माध्यमिक विद्यालयात सर्वात कमी ७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

तालुक्यातील शंभर टक्के निकाल लागलेली विद्यालये- पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे, वीर बाजीप्रभू विद्यालय शिंद, पिसावरे माध्यमिक विद्यालय, पसुरे माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल वरवे, न्यू इंग्लिश स्कूल उत्रौली, राजगड ज्ञानपीठ माध्यमिक विद्यालय जोगवडी, कान्होजी जेधे विद्यालय कारी, रायरेश्वर माध्यमिक विद्यालय टिटेघर, संत लिंगनाथस्वामी माध्यमिक विद्यालय निगडे, कुरुंजाई माध्यमिक विद्यालय कुरुंगवडी, न्यू इंग्लिश स्कूल कामथडी, विजय मुकुंदराव आठवले माध्यमिक विद्यालय माळेगाव, बसरापूर माध्यमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय कांबरे खे.बा., समर्थ विद्या मंदिर वेळवंड, शासकीय आश्रमशाळा कुरुंजी, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल भोर, अमृता विद्यालयम् नसरापूर, भोर इंग्लिश मीडियम स्कूल भोलावडे आणि नवसह्यादी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल नायगाव.

इतर विद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे- राजा रघुनाथराव विद्यालय (९७.४६ टक्के), श्री शिवाजी विद्यालय नसरापूर (९८.१९), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी (९९), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय भोर (९४.३८), न्यू इंग्लिश स्कूल न्हावी (९८.३६), नागेश्वर विद्यालय आंबवडे (९३.३३),
महात्मा ज्योतिबा फुले प्रशाला शिंदेवाडी (९१.४२), क्रांतिवीर फडके माध्यमिक विद्यालय चिखलगाव (९७.२९), न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर (९७.१४), सारोळे माध्यमिक विद्यालय (८६.३६), गर्ल्स हायस्कूल भोर (९५), आपटी माध्यमिक विद्यालय (९४.३३), काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय हातवे बुद्रुक (९७.८२), जिजामाता विद्यालय भोर (९८.१३), सिदोजी थोपटे विद्यालय खानापूर (९५.९१), अप्पासाहेब बांदल विद्यालय आळंदे (९५.४५), घेवडेश्वर माध्यमिक विद्यालय महुडे बुद्रुक (९७.१४), येसाजी कंक माध्यमिक विद्यालय करंदी-वाढाणे (९२.५९), मुरारबाजी देशपांडे विद्यालय वाठारहिंगे (९०.९०), रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालय नाटंबी (९५), बाजी पासलकर विद्यालय बाजारवाडी (९३.७५), काळेश्वरी माध्यमिक विद्यालय अंबाडे (९५.२३), रायरी माध्यमिक विद्यालय (९०), समर्थ रामदास स्वामी विद्यालय हिर्डोशी (९६.६६), शासकीय आश्रमशाळा पांगारी(९५.८३), श्री समर्थ माध्यमिक विद्यालय केळवडे (९५.४५), न्यू इंग्लिश स्कूल कुसगाव (९७.३६), पालसिध्देश्वर माध्यमिक विद्यालय पाले (९५.४५), अमृतराव बांदल माध्यमिक विद्यालय सांगवी-येवली (९२.८५).