संयोजन समितीच्या अध्यक्षपदी हसीना शेख
भोर, ता. २० : येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या हसीना शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारिणीही निवडण्यात आली, अशी माहिती कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव यांनी दिली.
उपाध्यक्ष म्हणून पोपटराव चव्हाण, योगेश कांबळे व अक्षय जाधव, तसेच, सचिवपदी योगेश सरोदे, सहसचिवपदी चंद्रकांत गायकवाड, कोषाध्यक्षपदी ज्ञानोबा घोणे तर अरुण डाळ यांची सहकोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. संमेलनाच्या ‘सूर्यफुले’ या अंकाचे संपादक म्हणून प्रा. सुजित चव्हाण यांची तर सहसंपादकपदी राहुल गायकवाड यांची निवड करण्यात आली.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी शहरातून काढण्यात येणाऱ्या संविधान रॅलीच्या नियोजन समितीचे प्रमुख म्हणून विशाल सावंत काम पाहणार आहेत. याशिवाय नीलेश घोडेस्वार, सागर कांबळे, सचिन जाधव, सुनील जाधव, वाल्मीक कांबळे, संकेत धनावडे, प्रफुल्ल बनसोडे, शत्रुघ्न तायडे यांची संविधान रॅलीच्या नियोजन समितीचे सदस्य म्हणून निवड केली आहे. संमेलनाच्या सल्लागार मंडळात डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. प्रदीप पाटील, कश्यप साळुंके, अॅड. किरण घोणे, गोविंदराव रणखांबे आणि इब्राहिम आतार काम पाहणार आहेत. प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख हे संमेलनाचे नियंत्रक असून संजय गायकवाड हे प्रसिद्धी प्रमुख आहेत.
05505