
बारामतीत शहीद कुटुंबीय, कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव
बारामती, ता. ४: येथील नवक्रांती सेवाभावी संस्था व विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद जवान अशोक इंगवले यांचे आई वडील विजया इंगवले व बापूराव इंगवले यांना वीर माता-पिता पुरस्काराने तर कारगिल योद्धे प्रदीप कदम यांना ‘वीर योद्धा’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी बारामती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष धनंजय जामदार होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजन बिचकर, बारामतीचे आगार प्रमुख अमोल गोंजारी, शशांक मोहिते, नीलेश काटे, उज्ज्वला कोकरे उपस्थित होते. याप्रसंगी देशकार्य करताना शहीद झालेल्या अशोक इंगवले यांच्या पत्नी गौरी यांना विरपत्नी पुरस्कार देण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या स्वरूपा शहा, पतीचे छत्र हरवल्यावरही घर सावरणाऱ्या वंदना महादेव टरले, सुवर्णा प्रकाश शेंडकर, सुनीता भालचंद्र गायकवाड, पूजा अंकुश निकाळजे, राजश्री रघुनाथ सत्रे यांना आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. मनीषा शिळीमकर, लता वाघमोडे, मीरा एकनाथ जाधव यांना लढाऊ माता पुरस्काराने गौरविण्यात आले.
गरिबीतूनही आपापल्या मुलांना फौजदारपदी पोचविणारे सुनंदा व सुभाष मोरे, लता शिंदे व मिलिंद शिंदे, बाळासाहेब पोमणे व हौसाबाई पोमणे या तीन दांपत्यास आदर्श माता-पिता पुरस्कार दिला. एकुलता मुलगा सेनादलात पाठविणारे सुभद्रा कांबळे व तुकोबा कांबळे तर एका मुलीवर कुटुंबनियोजन करणारे स्वाती सावंत व जालिंदर सावंत यांनाही आदर्श माता-पिता सन्मान प्रदान केला गेला.
स्वयंसिद्धा पुरस्काराने सुवर्णा कचरे, शिवानी घोगरदरे यांचा, सेवा पुरस्काराने कोरोनाकाळात मोफत डबे पुरविणारे उमेश गंगावणे व विकास हिरवे यांचा तर कलाकार नंदू मोरे व रवी शिंदे यांचा कला पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
प्रस्ताविक संयोजक चक्रपाणी चाचर यांनी केले. आभार मनीषा शिंदे यांनी मानले.
‘सकाळ’चे संतोष शेंडकर यांना पुरस्कार
दैनिक सकाळचे सोमेश्वरनगर येथील बातमीदार संतोष शेंडकर यांना ‘गुणवंत पत्रकार’ पुरस्कार तर शाळाबाह्य मुलांसाठी झगडणारे अनिल चाचर व वैशाली काटे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ब्रेक फेल दुचाकी अडवणारा रियाज तांबोळी यास शौर्य पुरस्काराने तर एकही सुट्टी न घेणारे दत्तात्रेय बारवकर यांना गुणवंत कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.
ID: BMT22B04980
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10435 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..