
बारामतीत कामगार दिनानिमित्त गुणवंत कामगारांचा सत्कार
बारामती, ता. ६ : कामगार दिनाचे औचित्य साधून बारामती बसस्थानकातील कर्मचारी तसेच राज्य विद्युत मंडळाच्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राज्य परिवहन मंडळाच्या बाळू गावडे, ब्रह्मदेव पवळे, अशोक बोबडे, जयश्री भुजबळ, यशवंत झांबरे, किशोर पवार, राजाराम अंबुरे, लालासाहेब जाधव, घनःश्याम शिंदे, बापू भिसे, माणिक राऊत, सिद्धार्थ मोरे, शिल्पा शिरसाट, जीवन शेळके यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, महावितरणचे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या हस्ते महावितरणमधील गुणवंत कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. उपविभागातून एका जनमित्राची व विभागातील एका यंत्रचालकाची या पुरस्काराची निवड होते. बारामती परिमंडलात १३ विभाग आणि ६० उपविभाग आहेत. त्याप्रमाणे पात्र १३ कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मंडलस्तरावर नियुक्त समिती काही निकषांवर पुरस्कारासाठी गुणवंत कामगारांची निवड करते.
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त श्रायबर डायनामिक्स डेअरीज एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांनी कंपनीच्या मेन गेटवरील असणाऱ्या संघटनेच्या बोर्डचे पूजन केले. या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंत कोकरे, कार्याध्यक्ष राजेंद्र काकडे, जनरल सेक्रेटरी गजानन भुजबळ, खजिनदार गणेश जगताप, ओंकार दुबे, तुळशीदास मोरे, गुलाब पठाण उपस्थित होते.
विभागांमध्ये बारामती अव्वल
यंदा प्रथमच महावितरणच्या मंडलातून २ उपविभाग व एका विभागाची निवड केली गेली. बारामती मंडलातून बारामती शहर व वालचंदनगर उपविभाग, सोलापुरातून सोलापूर शहर ई व अकलूज - २ उपविभाग तर सातारा मंडलातून कराड शहर व मेढा उपविभागाची निवड झाली. तर विभागाच्या निकषांमध्ये बारामती विभाग अव्वल ठरला. वरील सर्व पुरस्कार सांघिक स्वरूपाचे असल्याने त्यांच्या टीमने ते स्वीकारले.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10440 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..