शिक्षकांनी बदलत्या काळानुसार बदलावे : श्रीश कंबोज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांनी बदलत्या काळानुसार बदलावे : श्रीश कंबोज
शिक्षकांनी बदलत्या काळानुसार बदलावे : श्रीश कंबोज

शिक्षकांनी बदलत्या काळानुसार बदलावे : श्रीश कंबोज

sakal_logo
By

बारामती, ता. ६ : बदलत्या काळानुसार शिक्षकांनीही स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठानचे रजिस्ट्रार कर्नल श्रीश कंबोज (निवृत्त) यांनी केले. विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएससी) यांच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

शाळा कशी असावी, शिक्षक कसे असावेत, शिक्षक व विद्यार्थ्यांनी कोणते शिष्टाचार पाळावेत, कसे बोलावे, याबाबत त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. वर्गात जाण्यापूर्वी शिक्षकांनी कशी तयारी करावी, सराव कसा असावा, शाळेच्या व पालकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या अपेक्षा काय असतात, या बाबत त्यांनी विविध उदाहरणे देत मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10441 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top