
‘त्या’ झाडांची नुकसान भरपाई मिळणार नाही ः प्रांताधिकारी
बारामती: पालखी महामार्गावर मूल्यांकन केलेल्या दिनांकानंतर म्हणजेच संबंधित जमिनीची ३ (ए) अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर बेकायदेशीरपणे झाडाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मूल्यांकन व नुकसान भरपाई अदा करता येणार नाही, असे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कळविले आहे. राष्ट्रीय महामार्ग उपक्रमांतर्गत बारामती आणि इंदापूर तालुक्यात पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अनुसूचित नमूद केलेल्या जमिनी बोजा विरहित केंद्र शासनाकडे निहित झाल्या आहेत. सक्षम प्राधिकारी यांनी कायद्याप्रमाणे अधिकारांचा वापर करून संपादनाखालील जमिनीची हित संबंधितांना द्यावयाची नुकसान भरपाई निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तरीदेखील काही व्यक्ती संपादित जमिनीच्या मूल्यांकनाच्या दिनांकानंतर बेकायदेशीरपणे झाडाची लागवड करून त्याच्या मोबदल्याची मागणी करत आहेत आणि पालखी महामार्गाच्या कामात अडथळा आणत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, अशा बेकायदेशीर लागवड केलेल्या झाडांची नुकसान भरपाई अदा केली जाणार नसल्याचे कांबळे यांनी केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10446 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..