माळेगावात उद्या शेतकरी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावात उद्या 
शेतकरी मेळावा
माळेगावात उद्या शेतकरी मेळावा

माळेगावात उद्या शेतकरी मेळावा

sakal_logo
By

बारामती, ता. ५ : माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘शरद सभागृहा’मध्ये एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान प्रारंभ व शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवारी (ता. ७) केले आहे. सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे.
या शेतकरी मेळाव्यास ऊस संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भरत रासकर व कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. धरमेंद्रकुमार फाळके मार्गदर्शन करणार आहेत. या शेतकरी मेळाव्यास बारामती, दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10447 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top