बारामतीत इच्छुकांची मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत इच्छुकांची मोर्चेबांधणी
बारामतीत इच्छुकांची मोर्चेबांधणी

बारामतीत इच्छुकांची मोर्चेबांधणी

sakal_logo
By

बारामती, ता. ६ : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर बारामतीतही आता नगरपालिकेच्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. निवडणुका नेमक्या केव्हा होणार, प्रभागरचना कशी असेल, आरक्षण काय असेल, निवडणूका प्रभागरचनेनुसार होणार की वॉर्डनिहाय, याबाबत अद्यापही निश्चितता नसली, तरी इच्छुकांनी आपल्या दावेदारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
बारामती नगरपालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या यादीत आपला समावेश व्हावा, यासाठी इच्छुकांची धडपड सुरु झाली आहे. दुसरीकडे भाजपनेही यंदा नगरपालिका निवडणूकीसाठी तयारी सुरु केली आहे. थेट पक्षाच्या कमळ या चिन्हावरच राष्ट्रवादीविरूद्ध लढायचा मनसुबा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अद्याप अंतिम रणनीती समोर आलेली नसली, तरी यंदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, असा सामना रंगण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिफारशीसाठी इच्छुकांचे हेलपाटे
बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून असंख्य विकासकामे सुरु असतात. बारामती शहरातील सर्वांत महत्त्वाची संस्था म्हणून नगरपालिकेकडे पाहिले जाते. नगरपालिकेच्या बजेटचा आकडा एक हजार कोटींपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळविण्यासाठी इच्छुकांनी स्थानिक नेत्यांकडेही आपल्या नावाची शिफारस होण्यासाठी हेलपाटे मारण्यास सुरवात केली आहे. अनेकांनी विविध उपक्रमांसह विधायक कार्यक्रम आखून आपले महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसाधारणपणे काही अनुभवी व काही नवीन चेहरे घेत निवडणूक लढविण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे यंदाही नव्या जुन्यांचा संगम साधत ते उमेदवार देतील, अशी चर्चा आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10450 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top