भोंग्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोंग्यावरून राजकीय पोळी 
भाजण्याचा प्रयत्न : पवार
भोंग्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : पवार

भोंग्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : पवार

sakal_logo
By

बारामती, ता. ७ : ‘‘समाजात तेढ निर्माण व्हावी, गैरसमज व्हावेत, या उद्देशाने काही जण भोंग्याच्या विषयावरून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत,’’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली.
बारामतीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आपण वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने सर्वधर्मीय एकत्र राहतो आहोत, ती परंपरा तशीच पुढे कायम ठेवणयाची गरज आहे. भोंग्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचेच पालन केले जाईल. गेल्या काही दिवसात परस्परांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे. मात्र, याने समाजात तेढ वाढेल, हे कोणालाही न परवडणारे आहे. याबाबत सर्वांनीच विचार करून याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. सरकार या मुद्यावर खंबीर आहे.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10459 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top