बारामतीत साकारणार तीन चौपाट्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत साकारणार तीन चौपाट्या
बारामतीत साकारणार तीन चौपाट्या

बारामतीत साकारणार तीन चौपाट्या

sakal_logo
By

बारामती, ता. ९ : शहराच्या सौंदर्यात भर घालणारी व आबालवृद्धांना चार क्षण निवांतपणे व्यतीत करण्यासाठी उपयुक्त असणारी चौपाटी लवकरच साकारणार आहे. शहरात तीन ठिकाणी चौपाटी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याची माहिती बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.
बारामती शहरातील सध्याच्या साठवण तलावात एक कारंजे तयार केले आहे, त्याला जोडून आणखी कारंजी ओळीने साकारणार असून, त्याला लागूनच असलेल्या जागेमध्ये चौपाटी केली जाणार आहे. याबाबतचे सादरीकरण उपमुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात त्यांना केले. याबाबतच्या प्लॅनला त्यांनी मंजुरी दिली असून, साठवण तलाव, गरुड बाग ते स्वीमिंग टॅंकमधील नीरा डावा कालव्यालगतची जागा व नीरा डावा कालव्यालगत असलेल्या जागेत चौपाटी विकसित करण्याचे प्राथमिक नियोजन असल्याचे सचिन सातव म्हणाले.

अशी असेल रचना
नागरिकांसाठी ओपन जिम, खाद्यविक्रीचे स्टॉल, बसण्यासाठी बाके व मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी, अशी या चौपाटीची रचना असेल. बारामती शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ही ठिकाणे ठरतील. या ठिकाणी विद्युत व्यवस्थाही केली जाणार असून, संध्याकाळीही लोक या ठिकाणी चार क्षण विसावा घेऊ शकतील व मुले खेळू शकतील. अतिशय दर्जेदार व परदेशातील काही प्रतिकृतींनुसार याचे डिझाईन व्हायला हवे, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.
PNE22S63140

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10462 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top