विनयभंगप्रकरणी एकाला सश्रम कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनयभंगप्रकरणी एकाला सश्रम कारावास
विनयभंगप्रकरणी एकाला सश्रम कारावास

विनयभंगप्रकरणी एकाला सश्रम कारावास

sakal_logo
By

बारामती, ता. ९ ः विवाहितेचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने प्रशांत हिरालाल मोजर (रा. तांदूळवाडी, ता. बारामती) यास एक वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पराग वागडोळे यांनी सुनावली.
बारामती शहरातील तांदूळवाडी कल्याणीनगर येथे १५ जून २०१८ रोजी हा प्रकार घडला. पीडित महिला घरात एकटी असताना आरोपीने घरात घुसून पीडित महिलेचा हात धरला. तू मला आवडतेस पण मला रिस्पॉन्स देत नाही असे म्हणत महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत कोठे वाच्यता केल्यास तुला तसेच तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी दिली.
त्यानंतर पीडित महिलेने बारामती तालुका पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. बारामती न्यायालयात साक्ष पुरावे तसेच सरकारी वकील ॲड. राहुल सोनवणे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत येथील प्रथम वर्ग नाही दंडाधिकारी वागडोळे यांनी आरोपी यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील ॲड. राहुल सोनवणे यांना पोलिस नाईक पोपट कवितके यांनी सहकार्य केले. सदर घटनेचा तपास पोलिस हवालदार बंडगर यांनी केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10465 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top