
बारामतीत पूर्ववैमनस्यातून युवकावर प्राणघातक हल्ला
बारामती, ता. ११ : दोन लाखांची मागणी करत एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुनील संभाजी माने, विनोद शिवाजी माने (रा. प्रगतीनगर, बारामती) व अन्य दोघा अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गणेश बलभीम धोत्रे (रा. नेवसे रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली.
संशयितांपैकी दोघे यापूर्वीच्या मटका व्यावसायिक कृष्णा जाधव खून प्रकरणातील आरोपी आहेत. जामिनावर सध्या ते बाहेर आले होते. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार अद्याप फरारी आहेत.
‘तुला वाहनविक्री व मटक्याच्या व्यवसायातून पैसे मिळत असून, आम्हाला दरमहा दोन लाख रुपये दे,’ असे म्हणत फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला. फिर्यादीला चौघांनी सातव चौकात भेटायला बोलावले, तेथे शिवीगाळ करून पैशांची मागणी केली, फिर्यादीने नकार देताच त्याच्यावर हल्ला केला गेला. ‘तुला पैसे द्यावेच लागतील, नाही तर तुझा खेळ खल्लास करून टाकतो,’ असे म्हणत त्यांनी मारहाण केली. विनोद याने जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातील १३ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेत मोटारीतून ते निघून गेले.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10469 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..