बारामतीत एकावर फसवणुकीचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत एकावर फसवणुकीचा गुन्हा
बारामतीत एकावर फसवणुकीचा गुन्हा

बारामतीत एकावर फसवणुकीचा गुन्हा

sakal_logo
By

बारामती, ता. ११ ः नजरचुकीने आलेली 66 हजारांची रक्कम परत करण्यास नकार दिल्याप्रकरणी शहर पोलिसांनी उमेश नाना सुरवसे (पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संध्या वैभव काळे (रा. भिगवण रोड, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. ७ मे रोजी ही घटना घडली. फिर्यादी यांना स्वतःच्या फोन पे खात्यातून पतीच्या नावे रक्कम पाठवायची होती. त्यासाठी संपर्क क्रमांक शोधत असतानाच नजरचुकीने सुरवसे यांच्या क्रमांकावर ही रक्कम गेली. फिर्यादीने लागलीच ही बाब पतीला सांगितली. या दोघांनी सुरवसे यांना संपर्क करत चुकून तुमच्या खात्यावर रक्कम गेली असल्याचे सांगत ती परत करण्याची विनंती केली. सुरुवातीला सुरवसे यांनी ही रक्कम परत करण्याची तयारी दाखवली. नंतर फिर्यादीने वारंवार फोन केल्यावर त्यांचा मोबाईल क्रमांकच ब्लॉक केला. अन्य क्रमांकावरून संपर्क साधला असता पैसे पाठवतो असे सांगत ते पाठवण्यास टाळाटाळ केल्यानंतर हा गुन्हा दाखल केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10470 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top