बारामती-फलटण रेल्वेचे भूसंपादन रुळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती-फलटण रेल्वेचे भूसंपादन रुळावर
बारामती-फलटण रेल्वेचे भूसंपादन रुळावर

बारामती-फलटण रेल्वेचे भूसंपादन रुळावर

sakal_logo
By

बारामती, ता. १२ : महत्वकांक्षी असलेल्या बारामती- फलटण लोहमार्गाच्या कामाला आता अधिक गती देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी घेतला आहे. त्यासाठी वेगाने भूसंपादन व्हावी, या दृष्टिकोनातून स्वतः जिल्हाधिकारी या कामाचा दैनंदिन आढावा घेणार आहेत.
बारामती-फलटण-लोणंद लोहमार्गापैकी फलटण ते लोणंद हे काम पूर्णत्वास गेले आहे. बारामती ते फलटण हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दक्षिण भारताला जोडणारा हा जवळचा रेल्वे मार्ग ठरणार आहे. त्यामुळे बारामती देखील रेल्वेच्या नकाशावर ठळकपणे येणार आहे. बारामती ते फलटण या लोहमार्गाच्या कामासाठी १३ गावांतील २४३९ खातेदारांची जमीन अद्याप संपादन करायचे काम बाकी आहे. दोन वर्षे कोविडच्या प्रभावामुळे हे कामही रखडले होते. आता मात्र या कामाला गती प्राप्त होणार आहे. आजपर्यंत फक्त १९९ खातेदारांचे जमीन संपादित केली असून, २१४ पैकी ८२ गटांतील जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे.

मूल्यांकन होणे बाकी
बारामती ते फलटण रेल्वे मार्गाची लांबी ३७.२० किलोमीटर इतकी आहे. खासगी वाटाघाटीने लाटे व माळवाडी या दोन गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली. यापुढील काळात कऱ्हावागज व सोनकसवाडी या ठिकाणी भूसंपादन बैठकीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. कटफळ गावातील भूसंपादनासाठी मूल्यांकनाचा प्रस्ताव तयार केला असून, नेपतवळण, कुरणेवाडी, कऱ्हावागज, थोपटेवाडी, बऱ्हाणपूर, तांदुळवाडी या ठिकाणी मूल्यांकन होणे बाकी आहे.

५० कोटींचा निधी शिल्लक
या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी २३९ कोटी रुपयांची आवश्यकता असून, त्यापैकी रेल्वे विभागाकडून ११५ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम महसूल विभागाला प्राप्त झाली आहे. त्यापैकी ६४ कोटी ८६ लाख रुपये वाटप केले आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी अद्याप ५० कोटी रुपयांचा निधी महसूल विभागाकडे शिल्लक आहे. आता स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रक्रिया मनावर घेतली असल्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने महसूल विभागाने यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

शक्य तितक्या लवकर भूसंपादन करून ती जमीन रेल्वे विभागाच्या ताब्यात देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

दृष्टिक्षेपात बारामत-फलटण रेल्वे मार्ग
• रेल्वेमार्गाची एकूण लांबी- ३७.२०
• रेल्वेमार्गाचे संपादन करायचे क्षेत्र- १८३. ९१ हेक्टर आर.
• एकूण गटांची संख्या- २९६
• संपादित करावयाच्या शिल्लक गटांची संख्या- २१४
• एकूण खातेदारांची संख्या- २६३८
• खाजगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली गावे- २ं

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10471 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top