बालनिरीक्षण गृहातून ४ अल्पवयीन मुले बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालनिरीक्षण गृहातून 
४ अल्पवयीन मुले बेपत्ता
बालनिरीक्षण गृहातून ४ अल्पवयीन मुले बेपत्ता

बालनिरीक्षण गृहातून ४ अल्पवयीन मुले बेपत्ता

sakal_logo
By

बारामती, ता. ११ ः शहरातील बाल निरीक्षण गृहातून चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
बाल निरीक्षण गृहाचे काळजीवाहक सचिन सदाशिव गायकवाड यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही मुले बालकल्याण समिती पुणे यांच्या आदेशानुसार संस्थेत दाखल झाली होती. 9 मे रोजी रात्री नऊ वाजता फिर्यादी कामावर आले असताना त्यांनी हजेरी घेतली. त्यानंतर झोपण्यासाठी मुले सोडताना पुन्हा हजेरी घेतली असता चार मुले कमी असल्याचे लक्षात आले. बालनिरीक्षण गृहाकडून त्यांचा रेल्वे स्थानक, बस स्थानक, तांदूळवाडी, कटफळ आदी भागात शोध घेण्यात आला. ही मुले बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसात फिर्याद नोंदविण्यात आली.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10472 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top