बारामतीतील चार यात्रेकरू दिल्लीजवळ अपघातात ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीतील चार यात्रेकरू 
दिल्लीजवळ अपघातात ठार
बारामतीतील चार यात्रेकरू दिल्लीजवळ अपघातात ठार

बारामतीतील चार यात्रेकरू दिल्लीजवळ अपघातात ठार

sakal_logo
By

बारामती, ता. १२ : चारधाम यात्रेसाठी निघालेल्या बारामतीतील यात्रेकरूंच्या बोलेरो जीपला दिल्लीजवळील नोईडा (उत्तर प्रदेश) परिसरात झालेल्या अपघात झाला. त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात कर्नाटकमधील एका महिलेचाही मृत्यू झाला आहे. या जीपमधून सात जण प्रवास करत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून, अपघातग्रस्त जीपचा चालक गंभीर जखमी आहे. तसेच, जीपमधील आणखी एक महिला गंभीर जखमी आहे.
चारधाम यात्रेसाठी एकूण पन्नास लोक महाराष्ट्रातून निघाले होते. त्यांनी बुधवारी (ता. ११) रात्री वृंदावन येथे मुक्काम केला. त्यानंतर गुरुवारी पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, पहाटे साडेपाचच्या दरम्यान नोएडाजवळील जेवर या गावाजवळ त्यांच्या बोलेरो जीपची डंपरच्या मागील बाजूला जोरदार धडक बसली. या अपघातात चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे हे दांपत्य, तसेच रंजना भरत पवार व मालन विश्वनाथ कुंभार या बारामतीकरांचा; तर निवंजन मुजावर या कर्नाटकमधील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, जीपचा चालक नारायण कोळेकर (रा. फलटण, जि. सातारा) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. नोएडामधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त सुनीता राजू गस्टे ही चिकोडी (कर्नाटक) येथील महिला या अपघातात जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून, त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. मात्र, अपघात अतिशय भीषण होता. त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताची दखल घेतली असून, दिल्लीमध्ये यंत्रणेला मदतीचे आदेश त्यांनी स्वतः दिले. त्यांच्या वतीने व खासदार सुप्रिया सुळे यांनीही मृतदेह नोएडाहून बारामतीला आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या संदर्भात विनंती केली आहे.

मैत्री अखेरपर्यंत कायम
रंजना पवार व मालन कुंभार या दोघी गेल्या काही वर्षांपासून सोबतच सगळीकडे यात्रेसाठी जात असत. त्यांची घट्ट मैत्री झाली होती. या प्रवासातही त्या सोबतच होत्या. शेवटच्या क्षणीही त्यांची मैत्री कायमच राहिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10476 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top