महिलेचे फोटो व्हायरल करणाऱ्या दांपत्यावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेचे फोटो व्हायरल 
करणाऱ्या दांपत्यावर गुन्हा
महिलेचे फोटो व्हायरल करणाऱ्या दांपत्यावर गुन्हा

महिलेचे फोटो व्हायरल करणाऱ्या दांपत्यावर गुन्हा

sakal_logo
By

बारामती, ता. १३ : कामाला असलेल्या महिलेची अश्लील छायाचित्रे पतीसह नातेवाइकांना पाठवून बदनामी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी देवीलाल पेमाराम कुमावत व पायल देवीलाल कुमावत या दांपत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका चोवीस वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. देविलाल याने व्हिडिओ कॉलवर तिचे नको त्या अवस्थेतील प्रसंगाचे स्क्रीन शॉट करून ठेवले. त्यानंतर त्या महिलेने आपल्याकडेच कामाला यायला हवे, नाहीतर फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देत देवीलाल व त्याच्या पत्नीने महिलेचा पती व इतर नातेवाइकांना हे फोटो पाठवले. त्यामुळे महिलेने शहर पोलिसात देवीलाल याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन देवीलाल व त्याची पत्नी पायल यांच्याविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10480 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top