तलवार बाळगल्याप्रकरणी बारामतीत तरुणावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलवार बाळगल्याप्रकरणी 
बारामतीत तरुणावर गुन्हा
तलवार बाळगल्याप्रकरणी बारामतीत तरुणावर गुन्हा

तलवार बाळगल्याप्रकरणी बारामतीत तरुणावर गुन्हा

sakal_logo
By

बारामती, ता. १३ : तलवार आढळून आल्याने प्रकाश मारुती चांदगुडे (रा. जामदार रोड, कसबा, बारामती) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिस कर्मचारी तुषार चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ११ मे रोजी पोलिसांकडून गस्त सुरु असताना जामदार रस्त्यावरील मुक्ती टाऊन शेजारी एक युवक संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्याच्या हातातील पोत्यात काही तरी गुंडाळलेले दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेत पोत्यात काय आहे, अशी विचारणा केली. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी झडती घेतली असता पोत्यात धारदार तलवार गुंडाळलेली दिसून आली. पोलिसांनी ही तलवार जप्त केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10482 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top