
बारामतीत वेटरकडून आचाऱ्याचा खून
बारामती, ता. १३ : किरकोळ कारणावरून आचाऱ्याचा खून करणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्यास बारामती तालुका पोलिसांनी तासाभरातच गजाआड केले.
‘माझ्या ताब्यातील किचनमध्ये तू पाय ठेवायचा नाही,’ या एका वाक्यावरुन चिडून जात विकास दीपक सिंग (वय २३, मूळ रा. चंडीगड, पंजाब, सध्या रा. आमराई, बारामती) याने बारामतीतील ‘मातोश्री’ या हॉटेलातील आचारी गणेश प्रभाकर चव्हाण (रा. मालेगाव, जि. नाशिक) याचा खून केला. चेहऱ्यावर चाकूचे वार करत हा खून झाला. खुनानंतर पंजाबला पलायनाच्या तयारीत असलेल्या विकास सिंग याला तालुका पोलिसांनी तासातच जेरबंद केले. पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्या नेतृत्वाखाली फौजदार लेंडवे, सहायक फौजदार भागवत, राम कानगुडे, रणजित मुळीक, प्रशांत राऊत, अमोल नरुटे यांनी जेरबंद केले.
हॉटेल मालकास खोटे नाव सांगून विकास सिंग बारामतीत वास्तव्य करत होता. त्याला नाशिक पोलिसांनी या पूर्वी तडीपार केले होते. त्याच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती महेश ढवाण यांनी दिली.
बारामतीतील हॉटेल मालकांनी आपल्याकडे कामावर ठेवलेल्या कामगारांची सर्व माहिती पोलिस ठाण्याला द्यावी. कामगारांची आधारकार्ड घ्यावीत, आपण कामावर ठेवत असलेले कामगार गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत ना, याची खात्री करावी. अन्यथा हॉटेल मालकांवरच गुन्हे दाखल करण्याची वेळ येईल.
- महेश ढवाण, पोलिस निरीक्षक
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10484 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..