बारामतीत कारभारी जिमखाना क्रिकेट क्लबची विजयी सलामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत कारभारी जिमखाना क्रिकेट क्लबची विजयी सलामी
बारामतीत कारभारी जिमखाना क्रिकेट क्लबची विजयी सलामी

बारामतीत कारभारी जिमखाना क्रिकेट क्लबची विजयी सलामी

sakal_logo
By

बारामती, ता. १३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सुरू असलेल्या १४ वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत पहिला सामना कारभारी जिमखाना क्रिकेट क्लब विरुद्ध रॉयल क्रिकेट ॲकॅडमी यांच्यात झाला. यामध्ये कारभारी जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना कारभारी संघाचा खेळाडू आनंद बनसोडे यांनी एकूण ७० चेंडूत १२२ धावा केल्या. त्याला शिवरत्न सूर्यवंशी याने ४२ चेंडूत ८७ धावा करत, तर रुद्र याने ११ धावा फटकावित संघाने २४८ धावांचा डोंगर रचला. रॉयल ॲकॅडमी संघाचा डाव २४८ धावांचा सामना करताना अवघ्या ६२ धावात संपुष्टात आला. या सामन्यात कारभारी संघाने १८६ धावांनी विजय प्राप्त केला. यामध्ये साईराज शेलार व श्रेयस आंबीलढगे यांनी प्रत्येकी तीन व आर्यन कुमावत याने दोन बळी घेतले. आनंद बनसोडे याला सामनावीर तर शिवरत्न सूर्यवंशी याला फायटर ऑफ द मॅच हा किताब कारभारी जिमखान्याचे सचिव प्रशांत सातव यांनी बहाल केला. सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन कौतुक केले. या खेळाडूंना नितीन सामल, संजय हाडके यांचे सहकार्य लाभत आहे, सचिन माने, सचिन काळभोर, सोनल देवकाते या खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10485 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top