बारामतीत प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत प्रेम प्रकरणातून 
अल्पवयीन मुलावर हल्ला
बारामतीत प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर हल्ला

बारामतीत प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर हल्ला

sakal_logo
By

बारामती, ता. १३ : प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर तिघांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) भिगवण रस्त्यावरील महानगर बॅंकेजवळ घडली.
हल्ला झालेला अल्पवयीन मुलगा शहरातील त्रिमूर्तीनगर भागात राहतो. शुक्रवारी तो एका सलून दुकानात केस कापण्यासाठी गेला होता. तो दुकानाबाहेर थांबला असताना त्याचे मित्र असणाऱ्या तिघांनी हा हल्ला केला. संशयित तिघांपैकी एकाच्या प्रेम प्रकरणामध्ये हा अल्पवयीन मुलगा आडवा येत असल्याच्या संशयातून हा हल्ला केला. यात त्याच्या डोक्याला व पाठीला जबर जखम झालेली आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तिघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला. भर रस्त्यावर ही घटना घडल्यामुळे या भागात काही काळ खळबळ माजली होती.
या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दवाखान्यात जाऊन जखमीची चौकशी केली. त्यांनी घटनास्थळीही भेट दिली. संशयित आरोपीसुद्धा अल्पवयीन असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10488 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top