
विद्या प्रतिष्ठानमध्ये एलईडी दिव्यांबाबत कार्यशाळा
बारामती, ता. १४ : विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाच्या वतीने एलईडी दिवे तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले. याचे उद्घाटन डॉ. अविनाश रोकडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या हस्ते झाले. डॉ. रोकडे यांनी एलईडी, पीसीबी डिझाईन, एलईडी ड्राइव्हर, सोल्डरींग, कॉम्पोनंट फिटिंग, इलुमिनेशन टेस्टिंग या मूलभूत संकल्पनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शाश्वत ऊर्जा निर्मितीसह उर्जाबचतही अत्यावश्यक आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी सांगितले. डॉ. प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. शामराव घाडगे उपस्थित होते. कार्यशाळेत १३० विद्यार्थ्यांनी एलईडी बल्ब निर्मिती केली. याप्रसंगी विद्यार्थांना प्रशिक्षण प्रमाणपत्रे देण्यात आली. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. महेश वेदपाठक, डॉ. रमेश देवकाते, डॉ. जयश्री चिमणपुरे तसेच विभागातील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10489 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..