बारामतीत ‘राष्ट्रवादी’कडून चितळे, भावे यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत ‘राष्ट्रवादी’कडून  
चितळे, भावे यांचा निषेध
बारामतीत ‘राष्ट्रवादी’कडून चितळे, भावे यांचा निषेध

बारामतीत ‘राष्ट्रवादी’कडून चितळे, भावे यांचा निषेध

sakal_logo
By

बारामती, ता. १४ : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरून बदनामी केल्याप्रकरणी ॲड. नितीन भावे व केतकी चितळे यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी बारामती तालुका व शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १४) केली.
बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांना भेटून तालुकाध्यक्ष वनिता बनकर, शहराध्यक्षा अनिता गायकवाड, युवतीच्या अध्यक्षा आरती गव्हाळे व भाग्यश्री धायगुडे यांच्यासह महिलांनी हे निवेदन दिले.
प्रसिद्धी मिळविण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर टीका केली जाते, असा आरोप करून या दोघांचा महिलांनी निषेध केला. गेल्या ५५ वर्षांपासून राष्ट्रीय व राज्य पातळीवर शरद पवार यांनी काम केले आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीविरुद्ध, अशा स्वरूपाची भाषा वापरणे निषेधार्ह असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10491 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top