
बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये चर्चासत्राचे आयोजन
विद्या प्रतिष्ठानमध्ये चर्चासत्र
बारामती, ता १९ : विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व वसंतराव पवार विधी महाविद्यालय आणि भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचे नियंत्रक जनरलचे डीपीआयआयटी कार्यालय यांच्या वतीने “पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, जी आय या बाबत जागृता” या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन केले गेले
अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर व विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल शहाणे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नियंत्रक पेटंट आणि डिझाईनचे सहाय्यक मनोज सोमकुवार यांचा सत्कार करण्यात आला.
सोमकुवर यांनी आपल्या भाषणात पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, जी. आय. या संकल्पना नेमक्या काय आहेत पेटंट म्हणजे काय आहे? पेटंट कसे करावे? पेटंट करण्याची प्रक्रिया कशी असते? पेटंटचे प्रकार कोणते? तसेच काँपीराईट म्हणजे काय? काँपीराईट मालकाचे कोणकोणते अधिकार असतात? कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून आपण काय करावे? याबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी दीपक सोनवणे, हाफीज शेख, सुनील भोसले हे उपस्थित होते. दीपक सोनवणे यांनी आभार मानले. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, किरण गुजर, रजिस्टार श्रीश कंभोज यांनी मार्गदर्शन केले.